Join us

चणे, फुटाणे विकून शिकणाऱ्या संतोषला मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 4:26 AM

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री १० ते पहाटे ५ वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो.

मुंबई : मुंबईत चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाºया धडपड्या संतोष साबळे याला मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल, असा दिलासा दिला.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री १० ते पहाटे ५ वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. त्याचे स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. दिवसा तो कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरिन लाईन्स आणि गिरगाव चौपाटी येथे शेंगदाणे विकतो.

या बाबतच्या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याला मंत्रालयात बोलावून घेतले आणि त्याची आस्थेने चौकशी केली. तू मन लावून अभ्यास कर तुला सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही दिले. सामाजिक न्याय विभागाला याबाबतचे तसे निर्देशही दिले. भारावलेल्या संतोषने मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले. 

टॅग्स :उद्धव ठाकरे