मुंबई: मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धनादेशावर केली. त्यांनी एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश कुसूम वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहतादेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुरू झाल्यानं अनेक गरजूंना मोठी मदत होणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी झाला. त्यामुळे कित्येकांना रिकाम्या हातानं परतावं लागत होतं. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच पहिला स्वाक्षरी वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धनादेशावर केली. दादरच्या रहिवासी असलेल्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांच्याकडे फडणवीसांनी एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. यावेळी अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला. 'कार्यालय बंद. चौकशी करू नये', असा मजकूर असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला होता. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेनं आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला. हजारो गरजूंना याचा फटका बसला.
मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी; कर्करोगाशी झगडणाऱ्या महिलेला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:26 PM