Join us

उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’, उद्योजकांकडून ३०,२०० कोटींचे सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 7:35 AM

उत्तराखंडमधील गुंतवणुकीसाठी पार पडलेल्या या परिषदेत पुष्करसिंह धामी म्हणाले, आमच्या राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण उद्भणार नाही.

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर देवभूमि म्हणून उत्तराखंडची ओळख आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये परस्पर समन्वय व भागीदारी आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी पर्यटन, ऊर्जाप्रकल्प तसेच अन्य क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यासाठी आवश्यक सुविधा तसेच पर्यटन क्षेत्रात ५० टक्क्यांपर्यंतची कॅपिटल सबसिडी सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी रोड शोमध्ये (औद्याेगिक परिषद) ३० हजार २०० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

उत्तराखंडमधील गुंतवणुकीसाठी पार पडलेल्या या परिषदेत पुष्करसिंह धामी म्हणाले, आमच्या राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण उद्भणार नाही. राष्ट्राच्या विकासासाठी जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे तेथे आध्यात्मिक शक्ती व शांतीचीही गरज आहे. त्यासाठी मुंबई आणि उत्तराखंड पुरक असून उत्तराखंडमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यास रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१.२४ लाख कोटी गुंतवणुकीचे प्रस्तावआतापर्यंत देशात तसेच परदेशात झालेल्या रोड शोमधून उद्योजकांनी उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छा व्यक्त केली आहे, असे सांगतानाच आतापर्यंत विविध राज्य तसेच देशांतून १.२४ लाख कोटीहून अधिक गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत, असे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.उत्तराखंड सरकारने इज ऑफ डुइंग अंतर्गत उद्योगक्षेत्रात मोठी प्रगती केली असून उद्योजकांना उद्योगधंदे उभारण्यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी नवे धोरणही बनवले असल्याचे धामी यांनी सांगितले.

टॅग्स :उत्तराखंडमुंबई