मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:08 PM2021-03-18T15:08:40+5:302021-03-18T15:09:46+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.

CM doesn't let you sleep at night? Anil Deshmukh's answer on sachin vase case | मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

Next
ठळक मुद्देलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक केली आहे.  स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यामागे सचिन वाझेंचा(Sachin Vaze) हात असल्याचा संशय NIA ला आहे, त्याप्रकारे NIA अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे, परंतु या घटनेमुळे विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. अशातच मुंबई पोलीस दलावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. याप्रकरणी, मुख्यमंत्र्यांनीही विशेष लक्ष दिलं असून मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना झोपूच देत नाहीत, अशी चर्चा आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली  प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं. परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे. 

मुख्यमत्री तुम्हाला रात्री झोपूच देत नाहीत? असा प्रश्न अनिल देशमुख यांना मुलाखतीवेळी विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गृह खात्याचं कामच तशा पद्धतीचं आहे असे म्हणत उत्तराला बगल दिली. गृहमंत्री हे खातंच असं आहे की, कधी काय घटना घडेल ते सांगता येत नाही. काल रात्रीच आम्ही 1.30 वाजेपर्यंत एकत्र होतो. गृह विभागाला रात्रीचे तीन कधी वाजतात, 4 कधी वाजतात हे कळतही नाही. कारण, रात्री-अपरात्री कधी काय घटना घडतील ते सांगता येत नाही. रात्री 1 वाजता, 2 वाजता कधीही फोन येतो आणि तो फोन घ्यावाच लागतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आमचं सरकार स्थिर आहे, महाविकास आघाडी सरकारचं काम चांगलं आहे, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशातच राज्यात गृहमंत्री बदलावर चर्चा सुरु झाली होती. अनिल देशमुख यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना या पदावरून हटवावं अशी मागणी शिवसेनेच्या(Shivsena) एका गटाने केली होती, मात्र अनिल देशमुख यांची सचिन वाझे प्रकरणात कोणतीही चूक नाही, त्यांचा राजीनामा घेणार नाही असं सांगत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली होती.
 

Web Title: CM doesn't let you sleep at night? Anil Deshmukh's answer on sachin vase case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.