'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 06:18 PM2023-11-29T18:18:16+5:302023-11-29T18:22:36+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

CM eknath Shinde criticized on uddhav thackeray | 'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

मुंबई-  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळालेली नाही, यावरुन काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

"मी माझं काम करतो, ते बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत, बाळासाहेबांची शिकवण विसरलेत. त्यांच्या आरोप करणे हा एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली. "महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. राज्याला एक परंपरा आहे,  आरोप करणे, खालच्या पातळीत आरोप करणे, हे आमच्या संस्कृतीत नाही. त्यांच्याबाबतीत खुद्द शरद पवार यांनीही आपल्या पुस्तकात लिहिले आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दत्ता दळवींना जामीन नाहीच; उद्या न मिळाल्यास ईशान्य मुंबई बंद ठेवण्याचा ठाकरे गटाचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार काम करणारे आहे, घोषणा करुन फसवणारे नाही.पीकविमा एक रुपयात देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणारे सरकार आमचे आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोसणारं सरकार हे नाही. आम्ही सर्व पालकमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळेल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. 
  • झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. 
  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. 
  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्यात येणार आहे. 
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली आहे. 
  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित  सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. 
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे. 
  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. 

 

Web Title: CM eknath Shinde criticized on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.