आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:32 PM2023-07-28T12:32:50+5:302023-07-28T12:37:32+5:30

एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली.

CM Eknath Shinde gave information about the various works of the state government in the hall. | आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

googlenewsNext

मुंबई: इर्शाळवाडीत दिखाव्यासाठी गेलो नाही. आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही. दरडग्रस्तांची तात्पुरती कंटेनरमध्ये सोय करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिली. राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्याचा पाचवा दिवस आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली.

कृषी सेवकाचं मानधन वाढवून १६ हजार रुपये करण्यात आले. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे. विरोधकांनी टीका केल्या आम्ही कामातून प्रत्युत्तर देतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढ्यापुरती आमची जबाबदारी नाही. आम्ही तोंडाची वाफ दवडत बसत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते जनतेच्या भल्यासाठी घेतले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत, रस्ते तुडवत पाहणीला जातो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीसांची कामे स्थगित केली होती. हे आमचं सरकार आल्यावर लगेच ती कामे सुरु करण्यात आली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. 

Web Title: CM Eknath Shinde gave information about the various works of the state government in the hall.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.