Join us

शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 6:26 AM

मुंबईतील वॉर्डची संख्या ९ने वाढवून ती २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात घेण्यात आला होता

मुंबई : सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचनेचाही निर्णय एकनाथ शिंदे सरकारने बदलला आहे. मात्र या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. 

मुंबईतील वॉर्डची संख्या ९ने वाढवून ती २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात घेण्यात आला होता. विशेष म्हणजे नगरविकास विभागाकडून वॉर्डची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला होता. तेव्हा एकनाथ शिंदे हेच नगरविकास मंत्री होते. मग नगरविकास मंत्री असताना आपलाच निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा बदलू शकतात, असा शिवसेनेचा आक्षेप आहे.

शिवसेनेला धक्का देण्यासाठीच मुंबईतील वॉर्डची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.  हा निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नियमबाह्य पद्धतीने वॉर्डची संख्या वाढवल्याने ती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे