Join us

"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 2:51 PM

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले असून विरोधक देखील व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका करत आहे. याचदरम्यान आता सदर व्हिडिओवर एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. 

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठ्कीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद सोशल मीडीयावरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असं एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे, असे म्हणताना दिसून येत आहेत.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओत मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्यात नेमका कोणता संवाद झाला हे खाली वाचा...

मुख्यमंत्री शिंदे -आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो……येस

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी ट्विट केला होता व्हिडिओ-

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार