Join us  

मोठी घडामोड! आदित्य ठाकरेंसह त्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 5:54 PM

गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेनेतील अपात्रेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.

मुंबई- गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेनेतील अपात्रेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. दरम्यान आता मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या  निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दोन दिवसापूर्वी शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचा निर्णय देत आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकांवरही निकाल दिला होता. या निकालांविरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे आता शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 

निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच ठाकरे गटाचा प्रतोद, व्हीप अधिकृत असल्याचे म्हटले होते, त्याविरोधात जात नार्वेकरांनी निकाल दिला आहे. यावरून ठाकरेंनी दोन्ही निकालांना आव्हान देणारी याचिका आज दुपारी दोन वाजता दाखल केली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी ही याचिका ऑनलाईन दाखल केली असून आज सायंकाळी किंवा उद्या अंतिम याचिका दाखल करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे