'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:29 PM2023-12-06T12:29:28+5:302023-12-06T12:48:02+5:30
जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेशबैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या लाखो अनुयायींना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं.
पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र आदरांजली
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2023
06-12-2023 📍चैत्यभूमी, मुंबई https://t.co/rKTdTe7F29
डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे. त्यामुळेच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मुलाचा वाटा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतिस्थळाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने विशेष मानवंदनाही देण्यात आली. तसेच शांततेचे प्रतिक म्हणून हवेत फुगे सोडण्यात आले. याप्रसंगी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास भेट देऊन महामानव… https://t.co/X7BrOTDPvPpic.twitter.com/hgbdrIytGd
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2023