Eknath Shinde: तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:07 PM2022-08-28T12:07:14+5:302022-08-28T12:08:14+5:30

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात.

CM Eknath Shinde said that there is still time for Dussehra gathering, you will know about it soon. | Eknath Shinde: तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

Eknath Shinde: तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेणार का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

googlenewsNext

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दसरा मेळाव्याला अद्याप वेळ आहे, तुम्हाला याबाबत लवकरच कळेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. 

पडद्यामागून हालचाली सुरु-

राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आहे. शिवसेनेला शिंदे गटाचा तर विरोध आहेच; पण भाजपचाही क्रमांक एकचा राजकीय शत्रू शिवसेनाच आहे. त्यामुळे मेळाव्याची परवानगी शिवसेनेऐवजी शिंदे गटाला मिळावी यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेला परवानगी नाकारली गेल्यानंतर एकनाथ शिंदे गट या मेळाव्यासाठी परवानगी मागणार आहे. मात्र, परवानगी मिळाल्यास या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच मार्गदर्शन करणार का; तसेच त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मार्गदर्शन करणार का या सर्व बाबी अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

Web Title: CM Eknath Shinde said that there is still time for Dussehra gathering, you will know about it soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.