Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळं सभागृह हसले, फडणवीस लाजले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:30 PM2022-07-04T17:30:47+5:302022-07-04T17:34:04+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात गेल्या दहा दिवसात घडलेल्या राजकीय उलथापालथीवर सर्व परिस्थिती कथन केली आणि आपल्या पहिल्याच भाषणात त्यांची नर्म विनोदी, अनौपचारीक शैली संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली. 

cm Eknath Shinde Speech Everyone laughed in vidhan sabha devendra fadnavis also Embarrassed | Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळं सभागृह हसले, फडणवीस लाजले!

Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळं सभागृह हसले, फडणवीस लाजले!

googlenewsNext

मुंबई-

राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात आज शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठरावात बहुमत प्राप्त करत मोठी लढाई जिंकली. सरकारनं बहुमत सिद्ध केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावाची भाषणं यावेळी झाली. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात गेल्या दहा दिवसात घडलेल्या राजकीय उलथापालथीवर सर्व परिस्थिती कथन केली आणि आपल्या पहिल्याच भाषणात त्यांची नर्म विनोदी, अनौपचारीक शैली संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली. 

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिवसेना नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली. यात त्यांनी शिवसेनेसाठी आजवर केलेल्या परिश्रमांची माहिती तर दिलीच तसंच शिवसेनेला कुटुंब मानून केलेल्या त्यागाची जाणीव सभागृहाला करुन दिली. यावेळी एकनाथ शिंदे अपघातात गमावलेल्या दोन मुलांच्या आठवणीनं भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांना टोले हाणले तसंच गेल्या १० दिवसातील राजकीय घडामोडींमागची कहाणीच प्रांजळपणे सांगून टाकली. एकनाथ शिंदेंच्या याच मोकळेढाकळेपणामुळे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. 

विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? एकनाथ शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट 

"सगळ्यात मोठे कलाकार हे (देवेंद्र फडणवीस) आहेत. आम्ही कधी भेटायचो आमच्या लोकांना कळायचंच नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो आणि उठायच्या आधी परत यायचो", असं एकनाथ शिंदे भर सभागृहात म्हणाले आणि एकच हशा पिकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही यावेळी हसू आवरता आलं नाही. 

'मी मुख्यमंत्री होणार होतो पण, अजित पवारांनी...; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

"बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. जे जे बाळासाहेब बोलले होते ते ते आज मोदी साहेब पूर्ण करत आहेत. कलम ३७० हटवून टाकण्याबाबत बाळासाहेब बोलले होते आणि मोदी-शहांनी ते करुन दाखवलं. तुम्ही आता म्हणाल मी याबाजूला आलो म्हणून हे बोलतोय. पण तसं नाहीय. बाळासाहेब आणि दिघेसाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं शिवसेनेचं काम एक शिवसैनिक म्हणून आम्ही करत आहोत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

फडणवीसच मोठे कलाकार- एकनाथ शिंदे
सर्वपक्षीयांचे आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसच खरे कलाकार असल्याचं म्हटलं आणि सभागृहात हशा पिकला. "भाजपा, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाहीय, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा देखील आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. मी नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपाच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाहीय ना? पण आता तो सर्व बॅगलॉग भरुन काढणार आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

“आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणू, ते नाही केलं तर..,” एकनाथ शिंदेंचा निर्धार

"माझ्या बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस मोठे कलाकार आहेत. राज्यसभेसाठी आमची सगळी सेटिंग झाली होती. आपले दोन्ही उमेदवार निवडून आणायचे असं ठरलं होतं. आमचं सगळं ठरलं होतं. तसं आम्ही मतदानही केलं. फडणवीसांनी फासे कसे पालटले ते आम्हालाच काही कळलं नाही. बरं ते आमचा उमेदवार पडला पण काही जण म्हणाले अरे दुसराच पडला पहिला उमेदवार पडायला हवा होता. पण मी स्वत: सर्वांना सांगितलं होतं. आपल्याला दोन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

आमचे ७२ तासांत सरकार गेले, अडीच वर्षे मी, अडीच तुम्ही; फडणवीसांनी सांगितली अजित पवारांसोबतची 'डील'

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीदरम्यान, सुरू झालेल्या बंडाबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ज्या दिवशी विधानभवनातून आम्ही निघालो. त्याच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी मला जी वागणूक मिळाली. माझ्याशी ज्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडचे आणि तिकडचे आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

"मी नम्रपणे सांगू इच्छतो की, त्यावेळी मला तेव्हा काय झालं माहिती नाही. बाळासाहेब नेहमी सांगायचे की अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी बंड असेल उठाव असेल काही असेल केला पाहिले. माझा फोन फिरू लागला आणि धडाधड लोक जमू लागले. कुठे जातोय काय करतोय, कशासाठी जातोय कुणी काही विचारलं नाही", अशी माहितीही त्यांनी दिली.

Web Title: cm Eknath Shinde Speech Everyone laughed in vidhan sabha devendra fadnavis also Embarrassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.