Join us

एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिला धीर; आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक, लवकरच भरीव मदत देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:47 AM

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले. तसेच निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या नुकसानीचीही पाहणी केली. 

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून या संकटकाळात मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात येणार असून तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशेतकरीपाऊसमहाराष्ट्र सरकारदेवेंद्र फडणवीस