Join us

बाळासाहेबांना अभिवादन, दिघेंचं स्मरण अन् ठाण्यात जंगी सेलिब्रेशन... असा आहे CM शिंदेंचा आजचा कार्यक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 10:26 AM

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज शिंदे सरकारची बहुमताची अग्निपरीक्षा आहे.

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज शिंदे सरकारची बहुमताची अग्निपरीक्षा आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई जिंकल्यामुळे शिंदे गट आजहीचीही लढाई सहज जिंकेल आणि बहुमताची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं चित्र आहे. आज शिंदे सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर याचं जोरदार सेलिब्रेशन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे. 

विधानसभेत बहुमत चाचणी यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवन प्रेस रूम मध्ये पत्रकार परिषदेला सामोरे जातील. त्यानंतर बाहेर येऊन टीव्ही पत्रकारांना सामूहिकरीत्या संबोधित करतील. अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे दिवसभर मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. 

असा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कार्यक्रम...

1) हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील.

2) छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ( शिवाजी पार्क मधील) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जातील. 

3) चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. 

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट ठाण्याकडे निघतील. 

१) ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर ( आंनद नगर चेक नाका) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. 

२) गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील. 

3) टेम्भी नाका येथील आनंदाश्रम  येथे भेट देणार तसेच समोरील पुतळ्याला अभिवादन करणार

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या लुईसवाडी येथील 'शुभ-दिप' या निवास्थानी जातील. 

यावेळी ठाणे शहरातील शिवसैनिक आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे