Join us

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 7:17 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली आहे. सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे, तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी शिंदे यांनी राहुल गांधी यांच्याबरोबरच नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला. पूर्वी हिंदुत्व हा शब्द उच्चारायला लोक कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मानसन्मान जागा झाला असल्याचे शिंदे म्हणाले.

२२ जिल्ह्यांत गौरव यात्रा

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप-शिंदे गटातर्फे राज्यातील २२ जिल्ह्यांत ही गौरव यात्रा काढण्यात आली.

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोडो मारो आंदोलन केले होते. आता बाळासाहेबांचा वारसा सांगणारे लोक राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :एकनाथ शिंदेविनायक दामोदर सावरकर