शेतमालाची उत्पादकता, विपणन, निर्यातीवर अधिक भर - मुख्यमंत्री  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 06:17 AM2019-08-17T06:17:22+5:302019-08-17T06:17:45+5:30

कृषीक्षेत्राच्या विकासासाठी शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे.

CM emphasizes on productivity, marketing, export of goods | शेतमालाची उत्पादकता, विपणन, निर्यातीवर अधिक भर - मुख्यमंत्री  

शेतमालाची उत्पादकता, विपणन, निर्यातीवर अधिक भर - मुख्यमंत्री  

Next

मुंबई : कृषीक्षेत्राच्या विकासासाठी शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. शेतीच्या विकासदरापेक्षा अन्नप्रक्रिया क्षेत्राचा दर अधिक असायला हवा. यासाठी काही धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीक निघाल्यानंतर मूल्यवर्धन, शेती पतपुरवठ्याचे एकसूत्रीकरण इत्यादींबाबत उच्चाधिकार समितीने चर्चा केली असून, त्याबाबतचा मसुदा अहवाल दीड महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी
बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, पंजाबचे वित्तमंत्री मनप्रितसिंग बादल, उत्तर
प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप साही, ओरीसाचे कृषिमंत्री अरूण कुमार
साहू उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Web Title: CM emphasizes on productivity, marketing, export of goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.