सीकेपी बँक प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालणार
By admin | Published: December 12, 2014 01:49 AM2014-12-12T01:49:53+5:302014-12-12T01:49:53+5:30
खातेदारांचे प्रचंड हाल होत असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पत्रद्वारे केली आहे.
Next
मुंबई : अडचणीत सापडलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने खातेदारांचे प्रचंड हाल होत असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पत्रद्वारे केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देतानाच लवकरच यासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
2क्क् कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा नोंदविल्यानंतर आणि आर्थिक कोंडी झाल्यानंतर सीकेपी बँकेवर भारतीय रिझव्र्ह बँकेने र्निबधांची कारवाई करत प्रशासकाची नेमणूक केली. परंतु या कारवाईमुळे बँकेच्या ठेवीदारांना केवळ 1 हजार रुपये काढण्याची मुभा मिळाली. तर अत्यंत अडचणीत असलेल्या खातेदारांनाच 1 लाख रुपयांर्पयत रक्कम काढायची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आजच्या घडीला बँकेचे सुमारे 46 हजार खातेदार असून, ठेवीदारांची देय रक्कम 6क्क् कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे खातेधारकांना स्वहक्काचे पैसे मिळणो कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)
बॉम्बे मर्कन्टाईल बँक आणि मेरू कॅपिटल या दोन वित्तीय संस्थांनी बँकेच्या विलीनीकरणासंदर्भात रस दाखविला आहे. यासंदर्भात गेल्या सरकारमधील सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही बैठक झाली होती. परंतु, अद्यापही ठोस कार्यवाही होत नसल्याचा फटका ठेवीदारांना बसत आहे. परिणामी, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालण्याची विनंती या पत्रद्वारे हेगडे यांनी केली आहे.