मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. याआधी ना.स. फरांदे यांच्यासाठी काँग्रेसने असाच मनाचा मोठेपणा दाखवला होता याची आठवणही चव्हाण यांनी करून दिली आहे.लोकमतशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, ही पोटनिवडणूक आहे. या जागी काँग्रेसच्या तिकिटावर नारायण राणे निवडून आले होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसची होती. आता त्या जागेसाठी भाजपाने केवळ संख्याबळ आहे म्हणून भाजपाचा उमेदवार उभा केल्यास घोडेबाजार होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर काँग्रेसची जागा काँग्रेससाठी सोडून देण्याचा मोठेपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवा. याआधी अशा घटना घडल्या आहेत, असे सांगून चव्हाण म्हणाले, युती सरकारच्या काळात ना. स. फरांदे विधान परिषदेचे सभापती होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. पण काँग्रेसने बहुमत असतानाही फरांदे यांना सभापतीपदी कायम ठेवले.अविश्वास ठराव आणण्याची संधी असतानाही तो काँग्रेसने आणला नाही. केवळ ही दोनच नाही तर अशी अनेक उदाहरणे असल्याचेही ते पुढे म्हणाले, याचा अर्थ आम्ही निवडणुकांना घाबरतो असे मानायचे कारण नाही, लोकशाहीत केवळ संख्यबळाच्या जोरावरच सगळे विषय होत नसतात तर प्रथा, परंपरांचा अनादर होऊ नये याचाही विचार करूनच असे निर्णय घेतले जातात, असेही खा. चव्हाण या वेळीम्हणाले.दरम्यान, विधान परिषदेच्या एका जागेच्या निवडणुकीसाठी आपण काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. शिवसेनादेखील या निवडणुकीत योग्य तो विचार नक्कीच करेल, असेही तटकरे म्हणाले.गुजरात निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आम्ही आघाडी करणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस ८ ते ९ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले.>सत्ताधाºयांनी मोठेपणा दाखवावानागपूरच्या स्थानिक स्वराज संस्थातदेखील काँग्रेसने उमेदवार दिला नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे परिणय फुके निवडून आले. पोटनिवडणुकीत कधीही विरोधकांचा उमेदवार निवडून येत नाही, त्यामुळे सत्ताधाºयांनी तसा मोठेपणा दाखवण्याची प्रथा आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.
विधान परिषदेची जागा मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सोडावी- खा. अशोक चव्हाण
By अतुल कुलकर्णी | Published: November 24, 2017 5:37 AM