Uddhav Thackeray: “आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:08 PM2022-01-01T17:08:32+5:302022-01-01T17:09:15+5:30

Uddhav Thackeray: माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला असून, खोटे बोलायचे नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

cm uddhav thackeray criticised opposition at time announcement of property tax waiver for mumbaikars | Uddhav Thackeray: “आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Uddhav Thackeray: “आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Next

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो. केवळ तोंडातून वाफा काढत नाही, असा टोला विरोधकांना लगावला.

मुंबईकर म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवादेखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत. या उद्देशातून आणि शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 

आम्ही जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही

सन २०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केली आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. अनेक जण येतात आणि असे बोलायचे असते, असे बोलून जातात. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो ते करतो. मी मुंबईकरांना वचन देतो तुमच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

आवश्यकता वाटल्यास काही दिवसांनी कोरोनावर बोलेन

अनेकांना वाटले असेल की मी टीव्हीवर बोलत आहे म्हणजे फक्त करोनावर बोलणार आहे. तशी आवश्यकता लागली तर काही दिवसांनी बोलेन. या महत्त्वाच्या निर्यणातून मला व्यक्तीशाह अस्सल मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळेमुळे आहेत, ती विसरून चालणार नाही. १९६६ पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना आज कित्येक वर्षे मुंबईकरांच्या आशिर्वादाने मुंबई सांभाळत आहे, असे सांगत जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला

शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेले काम आज आम्ही पुढे नेत आहोत. मी सुद्धा नालेसफाईचे काम नाल्यामध्ये उतरून पाहिले आहे. आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता नवीन मित्र सोबत आले आहेत. तिघे मिळून आपण पुढे जात आहोत. इतर पक्ष आम्ही हे करु असे म्हणतात आणि कालांतराने तेही विसरतात आणि लोकसुद्धा विसरतात. खोटे बोलायचे नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: cm uddhav thackeray criticised opposition at time announcement of property tax waiver for mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.