Join us  

शिवाजी पार्कसाठी राज ठाकरे सरसावताच मुख्यमंत्री ठाकरे धावले; थेट १.२५ कोटी दिले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:06 PM

Uddhav Thackeray Fund For Shivaji Park: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्क भोवती ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठीच्या फुटपाथच्या निर्मितीसाठी १.२५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

मुंबई महानगरपालिका शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्च करणार आहे. पण त्याचसोबत आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिवाजी पार्क (Shivaji Park) भोवती ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंच्या 'वॉक'साठीच्या फुटपाथचं सुशोभीकरण आणि रोषणाईसाठी १.२५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदार निधीतून केला जाणारा हा पहिलाच प्रोजेक्ट ठरणार आहे. (CM Uddhav Thackeray Fund For Shivaji Park)

"मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कभोवती (शिवाजी पार्क) असलेल्या फुटपाथचा अनेक ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू दैनंदिन पातळीवर वापर करत असतात. पण संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी व्यवस्थित रोषणाई नसते. त्यामुळे माझ्या आमदार निधीतून १.२५ कोटी रुपयांचा निधी या कामासाठी वापरण्यात यावा", असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याचं मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितलं. 

विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना शिवाजी पार्कच्या नुतनीकरणाच्या प्रकल्पासाठी कॉर्पोरेट फंड जमा करण्यासाठीचं पत्र लिहीलं होतं. राज यांच्या पत्राच्या काही आठवड्यांमध्येच उद्धव ठाकरे यांन आपल्या निधीचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.  मुख्यमंत्र्यांनी केलेली निधी वापराची विनंती विशेष बाब म्हणून तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेराज ठाकरेमनसेशिवसेनामुंबई महानगरपालिका