मुंबई: भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे.
एकीकडे एकनाथ शिंदेंचं बंड सुरु असताना दूसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधत पुन्हा एकदा जोर लावून पक्षबांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले.
आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करु नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना म्हणाले. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, बंडखोर १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, महेश शिंदे, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आहे. शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार-
१) आदित्य ठाकरे २) अजय चौधरी ३) रमेश कोरगावकर ४) उदय सामंत ५) वैभव नाईक ६) रवींद्र वायकर ७) उदयसिंह राजपूत ८) संतोष बांगर ९) भास्कर जाधव १०) सुनील राऊत ११) राजन साळवी १२) दिलीप लांडे १३) नितीन देशमुख १४) कैलास पाटील १५) राहुल पाटील १६) सुनील प्रभू १७) प्रकाश फातर्पेकर १८) संजय पोतनीस.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे नवीन सत्ता समीकरण राज्यात लवकरच बघायला मिळू शकते. शिंदे हे येत्या एकदोन दिवसात त्यांच्या समर्थक आमदारांची यादी व पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देतील अशी शक्यता