बेस्टची ईलेक्ट्रिक सवारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 09:09 AM2021-08-08T09:09:53+5:302021-08-08T09:10:17+5:30

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

CM Uddhav Thackeray launches eco friendly BEST buses in Mumbai | बेस्टची ईलेक्ट्रिक सवारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बेस्टची ईलेक्ट्रिक सवारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

googlenewsNext

मुंबई : बेस्ट उपक्रमाची सुरुवात १८७४ मध्ये झाली तेव्हा बस घोडे ओढत असतं. आता इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल होत आहेत.  पर्यावरण संवर्धनासाठी सर्वच चर्चा करतात. पण बेस्टने इलेक्ट्रिक बसगाड्या वापरात आणून प्रत्यक्ष कृती केली आहे. कोविड काळातही बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. कर्मचाऱ्यांमुळेच बेस्टला प्रगती करणे शक्‍य होत आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. बेस्ट, लोकल, मेट्रोसाठी एकच तिकीट असावे असे आश्‍वासन निवडणुकीत दिले होते. त्याची आठवणही असून त्यावरही काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहिम येथील बेस्ट बस आगाराच्या नव्या इमारतीसह इलेक्ट्रिक बसेगाडीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा उपस्थित होते. इलेक्ट्रीक बसमुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही. प्रदुषण कमी होणार आहे. 

पंतप्रधानांना टोला..
बेस्टच्या वाहक नेहमी प्रवाशांना आगे बढो आगे बढो म्हणत असतो. तसाच देशालाही आगे बढो आगे बढो म्हणणारा नेता, पंतप्रधान हवा असे नेहमीच वाटायचे. बस कंडक्‍टरचे कामही तिकीट द्यायचेच. काही साम्य दिसत ना आपल्याला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

अशी आहे इलेक्ट्रिक बस...
बेस्ट उपक्रमाच्या ७४ व्या बेस्ट दिनी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.
२४ अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करणार आहेत. या बसगाड्यांचे किमान तिकीट दर सहा रुपये आहे.
पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत साधारणपणे अशा प्रकारच्या १८०० बस ताफ्यात येणार आहेत. साधारणपणे सव्वा ते दीड कोटी रुपये एवढी एका इलेक्ट्रिक बसची किंमत आहे.
१२ मीटर लांब आणि ३५ आसन क्षमता असलेली ही बस आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी व्हिलचेअर लिफ्ट बेस्ट बसमध्ये आहे.
बस एकदा चार्जिंग केल्यास दीडशे किलोमीटरपर्यंत प्रवास करता येऊ शकतो. अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टिम सोबतच मोबाईल चार्जिंग की सुविधा या बेस्ट बसमध्ये असणार आहे.
पावसाळ्यात बॅटरी खराब किंवा बंद पडणार नाही. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम बसमध्ये असल्याने चालक प्रवाशांना सूचना देऊ शकतो. तर प्रवाशांनाही येणाऱ्या बस स्थानकाची माहिती मिळू शकते.
टाटा कंपनीकडून १७५ मिनी आणि १७५ मोठ्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत. आतापर्यंत २२२ इलेक्‍टॉनिक बसेस आहेत.

Web Title: CM Uddhav Thackeray launches eco friendly BEST buses in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.