मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर वाहिली माजी पंतप्रधान राजीव गांधींना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:02 PM2020-08-20T14:02:22+5:302020-08-20T14:20:52+5:30

पंतप्रधान मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधींनी वाहिली राजीव गांधींना आदरांजली

cm uddhav thackeray pays tribute to former pm rajiv gandhi on his birth anniversary | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर वाहिली माजी पंतप्रधान राजीव गांधींना आदरांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर वाहिली माजी पंतप्रधान राजीव गांधींना आदरांजली

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना आदरांजली वाहिली. राजीव गांधींची आज ७६ वी जयंती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील राजीव गांधींना आदरांजली अर्पित केली. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सकाळीच वडील राजीव गांधींना आदरांजली वाहिली. 'राजीव गांधींकडे दूरदृष्टी होती. ते काळाच्या अतिशय पुढे आहेत,' अशा शब्दांत राहुल यांनी राजीव गांधींच्या कार्याचं स्मरण केलं. 'राजीव गांधींकडे दूरदृष्टी तर होतीच. पण ते माणूस म्हणून अतिशय प्रेमळ होते. ते माझे वडील होते ही माझ्यासाठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज आणि नेहमीच त्यांची आठवण येते,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले. १९८४ मध्ये राजीव गांधींच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतली. राजीव गांधींचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला. एलटीटीईनं केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींना जीव गमवावा लागला. तमिळनाडू २१ मे १९९१ रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींचा मृत्यू झाला.

Web Title: cm uddhav thackeray pays tribute to former pm rajiv gandhi on his birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.