Join us

CM Uddhav Thackeray To Shivsainik : "तुम्ही कृपा करून घरी जा, इकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही"; मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 8:35 PM

राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

CM Uddhav Thackeray To Shivsainik :  राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा दोघंही मुंबईत पोहचले. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं आहे. त्यावरून शिवसैनिक संतप्त झाले. यानंतर अनेक शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांची भेट घेत त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं.

“तुम्ही कृपा करुन सर्वजणी घरी जा. इकडे येण्याची कोणीही हिंमत करणार नाही. तुम्ही सकाळपासून इकडे आहात,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलं. मातोश्रीवरील बैठक आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आपण रात्रभर या ठिकाणी थांबू, काळजी करू नका असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं.

विरोध झाला तरी…कितीही विरोध झाला तरी शनिवारी सकाळी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटलं. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानवनीत कौर राणारवी राणा