मुंबई : निर्सग चक्रीवादळाचा बुधवारी कोकण किनारपट्टी भागात जोरदार तडाखा बसला. यात रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. येथील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीची आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघणार आहेत. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असणार आहे. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देणार आहेत.
याचबरोबर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असणार आहेत. तसेच, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे सुद्धा रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे आणीबाणीची परिस्थिती असल्याने गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईबाहेर म्हणजे राज्याच्या दौऱ्यावर गेले नव्हते. मात्र, आता निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उद्धव ठाकरे रायगडचा दौरा करणार आहेत.
आणखी बातम्या...
पाकचं नापाक कृत्य, आयएसआय एजंटकडून भारतीय राजदूतांचा पाठलाग!
मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड; बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या
BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा