Join us

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 3:39 PM

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा मुलगा तेजस यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाची दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा मुलगा तेजस यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या वांद्र्यातील मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले होते. यापूर्वीही मातोश्री बंगल्याजवळ तैनात असलेल्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती.  तेजस यांच्या सुरक्षारक्षकांनी तब्येत आता बरी आहे. या दोन्ही सुरक्षारक्षकांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली होती. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी 9615 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 57117 अशी झाली आहे. शुक्रवारी 5714 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 99967 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 143714 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! 

140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!

मुंबई इंडियन्सच्या जेतेपदानंतर टीमसमोरच त्यानं केलं फिल्मी स्टाईल प्रपोज अन्...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या