ठरलं! CM उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार; अमित शहांची घेणार भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:46 AM2021-09-22T09:46:30+5:302021-09-22T09:50:46+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात जूनमध्ये एक बैठक झाली होती.

cm uddhav thackeray will visit delhi for attend meeting called by amit shah over naxal issue | ठरलं! CM उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार; अमित शहांची घेणार भेट, चर्चांना उधाण

ठरलं! CM उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार; अमित शहांची घेणार भेट, चर्चांना उधाण

Next
ठळक मुद्देCM उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणारअमित शहांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणारया भेटीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना लसींचा पुरवठा, जीएसटी परतावा यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. जून महिन्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांसंदर्भात बैठक झाली. यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदिल्लीला जाणार आहेत. (cm uddhav thackeray will visit delhi for attend meeting called by amit shah over naxal issue)

SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार, २६ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला

अमित शहा-उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा होणार का, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता अनेक अर्थांनी उद्धव ठाकरे यांची ही दिल्लीवारी चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देणार आहेत. 

“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”

तीन मुद्दे केंद्रस्थानी असतील!

राज्यांमधील नक्षलवादाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राचे जे राष्ट्रीय धोरण आहे व कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे, त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. २०१५ मध्ये केंद्राने याबाबत धोरण निश्चित केले असून त्यात सुरक्षा उपाययोजना, विकासाला चालना आणि स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा गुरुवारी एक बैठक बैलावली असून, त्यात दिल्लीतील बैठकीत मांडायचे मुद्दे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चालले आहे, याची आकडेवारीच देत तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आरसाच दाखवला आहे.
 

Web Title: cm uddhav thackeray will visit delhi for attend meeting called by amit shah over naxal issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.