मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग धर्तीवर मुंबईतील नागपाड्यात महिला मुस्लीम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून नागपाड्यात आंदोलन करण्यात येत असून हे आंदोलन मागे घेण्यात यावं अशी विनंती मुंबई पोलिसांकडून वारंवार केली जात आहे. मात्र आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
मुंबईतल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईत शाहीनबागचा तमाशा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे प्रकार बंद होते. मुंबईत दंगल घडवणा-या रझा अकादमी सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केल्यानंतर अशा प्रकारांना ऊत येणे स्वाभाविकच नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली आहे.
नागपाडा येथील मुस्लीम बहुल भागात महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु केलेले आहे. केंद्र सरकारने आणलेला हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी या महिलांनी करत रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. मात्र या मोर्चामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णवाहिका, शाळेत जाणारे विद्यार्थी यांना वाहतूककोडींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती आंदोलकांना केली आहे. परंतु आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडूनही अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे विरोधक भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना टीकेचं लक्ष्य केलं जात आहे.
...मग शरद पवारांची भूमिका अचानक बदलली कशी?; भाजपाने काढला चिमटा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रझा अकादमीच्या नेत्यांसह २०० मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी रझा अकादमीचे सय्यद नुरी यांनी सांगितले होते की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामध्ये आम्ही सीएए आणि एनआरसी या कायद्याविरोधातील आमच्या भावना मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही सगळे देशाचे नागरिक आहोत. आपलं नागरिकत्व हटवण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे कोणालाही देश सोडण्याची गरज नाही असं ते म्हणाले. मात्र या भेटीचा संदर्भ देत भाजपाने शिवसेनेला टार्गेट केले. मुंबईत आझाद मैदान येथे घडलेल्या दंगलीचा आरोप रझा अकादमीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा
'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही'
चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका
Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त
धक्कादायक...! देशात 5 महिन्यांत चाईल्ड पॉर्नचा आकडा 25 हजारांवर; मुंबई, पुणे आघाडीवर