मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहून राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. (Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month Param Bir Singh writes to CM Uddhav Thackeray)षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्नपरमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचं म्हटलं आहे."आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"
मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण; पत्रावरच शंका?गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. 'paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असं केवळ नाव लिहिलेलं व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे,' असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोपांवर काय म्हणाले देशमुख ?"मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे," अशी प्रतिक्रिया यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या
काय आहेत पत्रातील मुद्दे? सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. गेल्या अनेक महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दरमहा १०० कोटी जमा करण्यास सांगितली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितलं. त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे गोळा करण्यासाठी काय करायचं हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितलं. मुंबईत १७५० बार आणि रेस्तराँ आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.