मुंबई - एकीकडे विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आज महानगर गॅस लिमिटेडने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो ६ रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो ४ रुपयांनी कपात केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. याबाबत माहिती देताना महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायूंच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर या किमतींमध्ये कपात करण्यास परवानगी दिल्यानंतर सीएनजीमध्ये प्रतिकिलो ६ रुपयांनी आणि पीएनजीमध्ये प्रतिकिलो ४ रुपयांनी कपात केली आहे. या कपातीनंतर मुंबईमध्ये सीएनजी हा प्रतिकिलो ८० रुपये दराने आणि पीएनजी प्रतिकिलो ४८.५० किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असेल.
CNG & PNG Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात, असे असतील नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 9:18 PM