CNG Rate: केंद्रीय बजेटपूर्वी मुंबईकरांना दिलासा; मध्यरात्रीपासून CNG दरात मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:22 PM2023-01-31T21:22:28+5:302023-01-31T21:22:42+5:30

३१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील. CNG च्या किंमतीत घट झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे

CNG Rate: Relief for Mumbaikars Ahead of Union Budget; Big reduction in CNG price from midnight today | CNG Rate: केंद्रीय बजेटपूर्वी मुंबईकरांना दिलासा; मध्यरात्रीपासून CNG दरात मोठी कपात

CNG Rate: केंद्रीय बजेटपूर्वी मुंबईकरांना दिलासा; मध्यरात्रीपासून CNG दरात मोठी कपात

googlenewsNext

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात CNG किंमतीत कपात करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात कंप्रेस्ड नॅच्युरल गॅसच्या किंमतीत अडीच रुपयांनी कपात केली केली अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत CNG वापरणाऱ्या वाहनांना आता किलो मागे ८९.५० रुपयांऐवजी ८७ रुपये मोजावे लागतील. 

३१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील. CNG च्या किंमतीत घट झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. कारण पेट्रोलच्या तुलनेने सीएनजीचे दर कमी असतात. ऑक्टोबर २०२२ मध्ये सीएनजी दरात ८० रुपयांवरून ८६ रुपये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एकदा-दोनदा वाढ झाल्याने सीएनजी दर ८९.५० रुपयांना प्रतिकिलो होते. आता सीएनजी दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय झाला आहे. महानगर गॅसच्या या निर्णयामुळे शहरातील ८ लाखाहून अधिक ग्राहकांना फायदा होणार आहे. 

डिसेंबरमध्ये झाली होती दरवाढ
नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी सर्वसामान्यांना सीएनजी दरवाढीचा फटका बसला होता. त्यावेळी सीएनजी दरात ३.५० रुपयांनी वाढ केली होती. तर घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी दरात दीड रुपयांची वाढ झाली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजी ८९.५० रुपये प्रतिकिलो तर पीएनजी ५४ रुपये प्रति एससीएम झाला होता. 

Web Title: CNG Rate: Relief for Mumbaikars Ahead of Union Budget; Big reduction in CNG price from midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.