सीप्झमध्ये सुरक्षारक्षकाच्या ‘मिसफायर’मध्ये सहकारी ठार

By admin | Published: March 24, 2017 01:22 AM2017-03-24T01:22:32+5:302017-03-24T01:22:32+5:30

सुरक्षारक्षक बंदूक अनलोड करीत असताना चुकून गोळी सुटून त्याचा सहकारी ठार झाल्याची घटना पश्चिम उपनगरातील सीप्झ परिसरात

Co-workers killed in the safety of 'Msfire' in Seepz | सीप्झमध्ये सुरक्षारक्षकाच्या ‘मिसफायर’मध्ये सहकारी ठार

सीप्झमध्ये सुरक्षारक्षकाच्या ‘मिसफायर’मध्ये सहकारी ठार

Next

मुंबई : सुरक्षारक्षक बंदूक अनलोड करीत असताना चुकून गोळी सुटून त्याचा सहकारी ठार झाल्याची घटना पश्चिम उपनगरातील सीप्झ परिसरात घडली. राधेमोहन सिंग असे मृत रक्षकाचे नाव असून, या प्रकरणी अवधेश सिंग याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
राधेमोहन सिंग हे माजी जवान असून, ते व अवधेश सिंग हे एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या ‘स्टेटमेट’ या कंपनीत कामाला होते. बुधवारी दुपारी अंधेरी सीप्झ परिसरातील कोटक महिंद्रा बँकेसमोर कंपनीच्या व्हॅनमधील रोकड एटीएममध्ये भरण्यात येत असताना दोघे जण आपल्याकडील रायफल अनलोड करत होते. त्या वेळी अचानकपणे अवधेशच्या रायफलमधील गोळी सुटून राधेमोहनच्या पोटात घुसली. गोळीबाराच्या आवाजाने स्थानिकांचे त्याकडे लक्ष गेले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या राधेमोहनला त्यांनी परिसरातील खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. अवधेशने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Co-workers killed in the safety of 'Msfire' in Seepz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.