निवासी इमारतींमध्ये को-वर्किंग स्पेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 02:06 AM2020-10-08T02:06:05+5:302020-10-08T02:06:18+5:30

व्यावसायिक गाळ्यांना नवा पर्याय

Co-working space in residential buildings | निवासी इमारतींमध्ये को-वर्किंग स्पेस

निवासी इमारतींमध्ये को-वर्किंग स्पेस

googlenewsNext

मुंबई : कोरोना पश्चातच्या काळातही वर्क फ्रॉम होम ही संस्कृती कायम राहण्याची चिन्हे असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या निवासी प्रकल्पांमध्ये को-वर्किंग स्पेस उभारणी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेकांना घरातून आपले कार्यालयीन कामकाज करणे अवघड जात आहे. त्यांच्यासाठी या को-वर्किंग स्पेस अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने अ‍ॅनरॉक प्रॉपर्टी या सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

काही मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये असलेल्या क्लब हाऊसचे रूपांतर को-वर्किंग स्पेसमध्ये करणे किंवा नव्या प्रकल्पांमध्ये त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे हे दोन्ही पर्याय सध्या अवलंबले जात आहे.

वर्क स्पेसची सुविधा देण्यासाठी प्रकल्पाचे आकारमानसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. साधारणत: ३०० घरांच्या मध्यम आकाराच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अशा पद्धतीची जागा निर्माण करणे शक्य आहे. परंतु, असे प्रकल्प मोक्याच्या ठिकाणी असतील तर या जागांमध्ये चांगली आर्थिक देवाणघेवाण होऊ शकते. केवळ संकुलातीलच नव्हे तर अन्य ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनाही तिथे आकर्षित करणे शक्य होऊ शकते, असे अ‍ॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांचे म्हणणे आहे.

आव्हाने आणि
आर्थिक उलाढाल
या जागांचा दीर्घकालीन वापर करताना त्याच्या देशभाल दुरूस्तीसाठी तरतूद करणे हे विकासकांसमोरचे प्रमुख आव्हान असेल. एकाच टप्प्यात ते पैसे वसूल करण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये व्यावसायिक गाळ्यांसाठी २४,५०० ते ३० हजार रुपये प्रति टेबल भाडे मिळते. को वर्किंग स्पेससाठी १८,५०० ते २८,५०० रुपयांपर्यत भाडे मिळू शकते. एसबीडीमध्ये २५ ते ३२ हजार रुपये भाडे आकारणी होत असून १३ ते २० हजार रुपयांपर्यंत आकारणी होते़

Web Title: Co-working space in residential buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.