Join us

युती सदस्यांचा जि. प. सभागृहात गोंधळ

By admin | Published: June 27, 2014 11:41 PM

कळवा येथील भूखंडावर जिल्हा परिषदेचे भव्य मुख्यालय बांधण्याचे नियोजित करण्यात आले.

ठाणो : कळवा येथील भूखंडावर  जिल्हा परिषदेचे भव्य मुख्यालय बांधण्याचे नियोजित करण्यात आले. पण घाई करून या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी काढलेल्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीचे पालकमंत्री गणोश नाईक, आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित यांच्यासह खासदारांची नावे घेतली नव्हती. यामुळे संतापलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सदस्यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून अध्यक्षांना अखेर क्षमा मागण्यास भाग पाडले.   
‘पालकमंत्र्यांसह खासदारांना स्थान नसलेली जि.प.ची निमंत्रण पत्रिका’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले असता त्याची दखल घेऊन शिवसेना-भाजपाच्या सदस्यांनी जिल्हा परिषद सभागृहात गाेंधळ घालून दीर्घकाळ कामकाज थांबविण्याचा प्रय} केला. शासनाकडून जागा परत घेण्याची शक्यता लक्षात घेऊन भूमिपूजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष इरफान भुरे यांनी सदस्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रय} केला.  परंतु त्यास न जुमानता शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश पाटील व भाजपाचे सदस्य संदीप पवार यांनी या भूमिपूजन सोहळ्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. काही दिवसांनी जिल्हा परिषद बरखास्त होणार आहे. यामुळे संगमरवरी दगडावर नाव कोरून घेण्यासाठी हे भूमिपूजन घाईघाईने करून घेतल्याचा आरोप करून युतीच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला.  अखेर अध्यक्षा व  उपाध्यक्षांनी चूक झाल्याचे मान्य करून क्षमा मागितल्यानंतर या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिले. या चर्चेत जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती ठाकरे, प्रकाश निकम, अशोक इरनक आदींसह अन्य सदस्यांनी सभागृहाचे काम काज रोखून धरत दीर्घ काळ गोंधळ घातला. स्थानिक आमदार व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार म्हणून राजन विचारे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत घेतल्याचा दावा या वेळी सभागृहात करण्यात आला. परंतु तो निष्फळ ठरला. कळवा-मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असल्यामुळे निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे खासदार डॉ. o्रीकांत शिंदे यांचे नाव अपेक्षित होते. याशिवाय पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या नावाचा समावेश आवश्यक होता.
 
3आरोग्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, जलसंवर्धन व पाणीपुरवठा विभाग हे जिल्हा परिषदेचे विभाग सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी काम करणा:या अधिकारी व कर्मचा:यांना तसेच कामासाठी येणा:या नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरम्यान ये-जा करावी लागत आहे. या नवीन होणा:या इमारतीमुळे हा त्नास वाचणार आहे.
4या इमारतीकरिता शासनाने 36 हजार 67क् चौ.मी. इतका भूखंड उपलब्ध करून दिला आहे. ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित ही इमारत असून या इमारतीसाठी 7क् कोटी रु पये अंदाजित खर्च ठरवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना एकाच इमारतीमध्ये वेगवेगळी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच मोठय़ा स्वरूपाच्या कार्यक्र मासाठी 1 हजार व 5क्क् बैठक क्षमतेची दोन सभागृहे बांधण्यात येणार आहेत.
 
1ठाणो जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक मुख्यालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन शुक्र वारी सकाळी जि.प. अध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या हस्ते कळव्यातील जलसंधारण विभागाच्या कम्पाउंडमध्ये पार पडले. या नवीन इमारतीमध्ये जि.प.तील सर्व 13 विभागांना सामावण्यात येणार आहे.
 
2ठाण्यातील तलावपाळी येथे सध्या ठाणो जिल्हा परिषदेचे मुख्यालय आहे. या ठिकाणाहून जिल्हा परिषदेचा कारभार हाकला जातो. अपु:या जागेमुळे जिल्हा परिषदेच्या 13 विभागांपैकी 9 विभाग इतरत्न कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागते.