Join us

हाजी अलीजवळून असा जाईल कोस्टल रोड, डिसेंबर २०२३ पर्यंत पहिला टप्पा खुला होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 5:57 AM

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या वरळी टोकापर्यंत जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत ...

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या वरळी टोकापर्यंत जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवले असले तरी सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकी एका मार्गिकांचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून त्या वाहनचालकांसाठी खुल्या केल्या जाणार होत्या; मात्र मार्गिका सुरू केल्यास याच टप्प्यातील दुसऱ्या मार्गिकांच्या कामांत येणारे अडथळे आणि सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येकी एक मार्गिका लगेचच खुल्या न करण्याचा निर्णय तूर्तास तरी घेण्यात आला आहे. 

हाजी अली ते मरिन ड्राइव्ह हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३, तर मे २०२४ मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्याचा पालिकेचा इरादा आहे. हाजी अली व महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळांजवळ; तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा करण्यात येत आहे.

प्रकल्पातील ठळक मुद्दे

  • रस्त्याची लांबी : १०.५८ कि.मी. 
  • मार्गिका संख्या : ८ (४ अधिक  ४), (बोगद्यांमध्ये मार्गिका ३ अधिक ३) 
  • पुलांची एकूण लांबी : २. ९ कि.मी. 

 

बोगद्याची वैशिष्ट्ये

  • पहिला बोगदा २०२२ मध्ये पूर्ण. दुसऱ्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर. 
  • आपत्कालीन सुटकेसाठी प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगदे बांधणार.
  • भूमिगत वाहनतळ : ४,
  • एकूण वाहनसंख्या : १८००  
टॅग्स :मुंबई