Join us

 मुंबई विमानतळावर पकडले २० कोटींचे कोकेन

By मनोज गडनीस | Published: March 25, 2024 6:13 PM

परदेशी महिला प्रवाशाला अटक, डीआरआयची कारवाई

मुंबई - नैरोबी येथून मुंबईत आलेल्या एका परदेशी महिलेकडून केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तब्बल १९ कोटी ७९ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. ही महिला सिएरा लिओन या देशाची नागरिक आहे. 

प्राप्त माहितीनुसार, नैरोबी येथून मुंबईत येणाऱ्या एका विमानाद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार, हे विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिच्या बुटांच्या तळव्यात, शॅम्पूच्या बाटलीत, मॉईश्चरच्या बाटतील तिने हे कोकेन लपविल्याचे आढळून आले. तिच्याकडून एकूण १९७९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई