मुंबई- आफ्रिका खंडातील सिएरा लिऑन येथून मुंबईविमानतळावर दाखल झालेल्या एका भारतीय नागरिकाला ४ किलो कोकेनची तस्कीर केल्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४० कोटी रुपये इतकी आहे.
त्याच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगेमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर असलेल्या दोन पिशव्या आढळून आल्या. अंमली पदार्थ ओळखण्याच्या विशिष्ट किटद्वारे त्या पावडरची तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.