Join us

विमानतळावर पकडले ४१ कोटींचे कोकेन, महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

By मनोज गडनीस | Updated: January 12, 2024 17:35 IST

इथोपियन विमान कंपनीच्या मुंबईत येणाऱ्या विमानातून कोकेनची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबई - आदिस अबाबा येथून इथोपियन विमान कंपनीने मुंबईत दाखल झालेल्या एका २१ वर्षीय महिलेला कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर संघटनेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तिच्याकडे सापडलेल्या कोकेन वजन १०० ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४१ कोटी रुपये इतकी आहे. ही २१ वर्षीय महिला थायलंडची नागरिक असून अनुयारिन से-होर असे तिचे नाव आहे. 

इथोपियन विमान कंपनीच्या मुंबईत येणाऱ्या विमानातून कोकेनची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांना सापळा रचला होता. ही महिला मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची झडती घेतली असता हे कोकेन आढळून आले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी