विदेशी ड्रग्ज तस्काराकडून ५१ लाखांचे कोकेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:37+5:302021-01-03T04:07:37+5:30
एएनसीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या ४४ वर्षीय होनोरे इग्वे गाही या ...
एएनसीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या ४४ वर्षीय होनोरे इग्वे गाही या विदेशी ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थविरोधी विभागाच्या वांद्रे पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून ५१ लाख किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले. तो कारमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना, पथकाने ही कारवाई केली.
थर्टी फर्स्ट आणि नववर्षानिमित्त मुंबईत ड्रग्ज तस्करांचा शोध सुरू असताना, शुक्रवारी सायंकाळी सांताक्रुझ परिसरात एका कारमध्ये बसलेल्या आफ्रिकन नागरिकाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. त्याच्याकडे चौकशी करताच, तो कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पथकाने त्याला अडवत ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ५१ लाख किमतीचे २०४ ग्रॅम काेकेन सापडले. तो दहावी पास असून, वाशी परिसरात राहण्यास आहे. मूळचा आयवरीनचा रहिवासी आहे. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) प्रवीण कदम, वांद्रे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
----------------------