नारळ बागायतदार हवालदिल

By admin | Published: June 14, 2014 11:42 PM2014-06-14T23:42:52+5:302014-06-14T23:42:52+5:30

डहाणू तालुक्यातील सागरी किनारपट्टी नारळ पिकांकरीता उपयुक्त असल्याने मोठया प्रमाणात येथे नारळ वृक्षाची लागवड केली जात आहे.

Coconut Bargate Havaldil | नारळ बागायतदार हवालदिल

नारळ बागायतदार हवालदिल

Next

अनिरुध्द पाटील, बोर्डी
डहाणू तालुक्यातील सागरी किनारपट्टी नारळ पिकांकरीता उपयुक्त असल्याने मोठया प्रमाणात येथे नारळ वृक्षाची लागवड केली जात आहे. काही वर्षांपासून नारळावरील रोगामुळे आर्थिक संकटात सापडलेला बागायतदार लांबलेला पाऊस आणि वादळी हवेने फळगळतीच्या समस्येने हवालदिल झाला आहे.
सागरी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये वालुकामय जमीन, खारेवारे, उष्ण व दमट हवामान नारळ पिकाकरिता अतिशय उपयुक्त आहे. बाणवली वेस्ट कोस्टल टॉल या नावाने संबोधल्या जाणाऱ्या नारळाच्या जातींची २२५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाल्याची नोंद तालुका कृषी विभागात उपलब्ध आहे. मात्र काही वर्षापासुन ऐरियोफाईड माईट (अष्टपाद कोळी) रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने डहाणू, घोलवड, बोर्डी, चिंचणी परिसरातील शेतकऱ्यांनी माडांची तोड केली आहे.

Web Title: Coconut Bargate Havaldil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.