- रोहित नाईक
मुंबई : भारत सणासुदीचा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सणाची खासियत म्हणजे त्या-त्या सणाचे स्पेशल पदार्थ. पण हेच पदार्थ तुमच्यापुढे आइस्क्रीमच्या रूपात समोर आले तर? होय, आइस्क्रीमचा हा भन्नाट प्रयोग केलाय तो सन्मिष मराठे आणि पराग चाफेकर या तरुणांनी. फळे, चॉकलेट्स, काजू-बदाम, केसर अशा नेहमीच्या फ्लेवर्सच्याही पुढे जात या तरुणांनी थेट नारळी-भात, पुरणपोळी, उकडीचे मोदक, तिळगूळ, फणस, काजूकतली, गुलाबजाम, गाजर-हलवा, केसर थंडाई असे अनेक हटके आइस्क्रीम तयार केले आहेत.
प्रत्येक सणानुसार येथे आइस्क्रीमची ऑर्डर द्यावी लागेल. ऑर्डर यासाठी, कारण अद्याप यांचे आइस्क्रीम पार्लर किंवा शॉप सुरू झालेले नाही. त्यामुळे, गुगलवर त्रयोग सर्च केल्यास तुम्हाला संपर्क करता येईल आणि पाहिजे त्या फ्लेवर्सचे आइस्क्रीम चाखता येतील. यामध्ये पुरणपोळी, नारळी भात आणि मोदक आइस्क्रीम वर्षभर उपलब्ध असून, इतर आइस्क्रीम मात्र सणांनुसार मिळतात.
कुठे? त्रयोग, तेजपाल स्कीम रोड- ५, विलेपार्ले - पूर्व
काय खाल? नारळी भात आइस्क्रीम, पुरणपोळी आइस्क्रीम, उकडीचे मोदक आइस्क्रीम