आचारसंहिता पडली पालिकेच्या पथ्यावर

By admin | Published: October 12, 2014 01:00 AM2014-10-12T01:00:32+5:302014-10-12T01:00:32+5:30

विधानसभेची आचारसंहिता महापालिकेच्या पथ्यावर पडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच परवानगी घेऊन अधिकृत होर्डिग लावले

Code of Conduct on the Path of the Municipal Corporation | आचारसंहिता पडली पालिकेच्या पथ्यावर

आचारसंहिता पडली पालिकेच्या पथ्यावर

Next
>नवी मुंबई : विधानसभेची आचारसंहिता महापालिकेच्या पथ्यावर पडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच परवानगी घेऊन अधिकृत होर्डिग लावले असून त्यामुळे महापालिकेस पंधरा दिवसांमध्ये 7 लाखपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. 
राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये अनधिकृत होर्डिगवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु यानंतरही सर्वच ठिकाणी मोठय़ाप्रमाणात अनधिकृत होर्डिग झळकत असतात. यामधून नवी मुंबईचीही सुटका झालेली नाही. शहरात होर्डिग लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेणो अत्यंत आवश्यक असते. त्यासाठीचे शुल्क विभाग कार्यालयात भरणो आवश्यक असते. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून राजकीय पक्षांचे पदाधिकारी होर्डिग लावत असतात. सण,उत्सव, नेत्यांचे वाढदिवस असले की शहर होर्डिगमय होत असते. यामुळे शहर विद्रूप होतेच त्याचबरोबर महसूलही बुडत असतो. सर्वच राजकीय पक्षांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे कोणीच आवाज उठवत नाही. अधिका:यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही दबाव येत असतो. यामुळे उत्सव संपेर्पयत व वाढदिवस होईर्पयत दुर्लक्ष करून नंतर कारवाई करण्यात येते. 
आचारसंहिता सुरू झाल्यापासून मात्र शहरातील अनधिकृत होर्डिग बंद झाले आहेत. राजकीय पदाधिका:यांनी नवरात्री उत्सवातही होर्डिगबाजी टाळली होती. सर्वपक्षीय उमेदवारांनी रीतसर परवानगी घेवून होर्डिग लावण्यास सुरवात केली आहे. 
शुक्रवार्पयत ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये जवळपास 765 होर्डिग लावण्यात आली असून त्यामधून तब्बल 7 लाख 18 हजार 496 रुपये महसूल प्राप्त झाला आहे. तुर्भेमध्ये सर्वाधिक 2 लाख 67 हजार 885 रुपयांचा महसूल मिळाला आहे.  महापालिकेमध्ये मागील वर्षभरात पंधरा दिवसांमध्ये एवढे पैसे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे इतर वेळेला बिनधास्त विनापरवाना जाहिरात लावणारे पदाधिकारी यावेळी विभाग कार्यालयामध्ये परवानगीसाठी तळ ठोकून असल्याचे चित्र दिसत आहे. 
 
महापालिकेस पंधरा दिवसांमध्ये होर्डिग परवानगीमधून जवळपास 7 लाखपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. वर्षभर नियमाप्रमाणो होर्डिग लावले तर पालिकेस करोडो रुपये उत्पन्न मिळू शकते. याशिवाय शहराचे विद्रुपीकरण थांबू शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
 
कोपरखैरणोत आदर्श पॅटर्न
 कोपरखैरणोमध्ये अशा ठिकाणी परवानगी देताना पहिला येईल त्यास प्रथम पसंती व रोटेशन पद्धतीने सर्वाना संधी असे धोरण अवलंबले असल्याने सर्वाना महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिग लावण्यास संधी मिळाली.
 
विभागसंख्या
बेलापूर122
तुर्भे2क्9
नेरूळ183
कोपरखैरणो67
विभागसंख्या
घणसोली44
दिघा61
वाशी63
ऐरोली16
 

Web Title: Code of Conduct on the Path of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.