Join us

कुलाबा - वांद्रे - सीप्झ मुंबई मेट्रो ३ मार्ग, मुसळधार पावसात मेट्रो पाण्याखाली जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 12:25 PM

पावसाळ्यात पुरापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात डि-वॉटरिंग पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईमेट्रो - ३ च्या वतीने पावसाळ्यात पुरापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात डि-वॉटरिंग पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण १.५ एचपी ते ७५ एचपी क्षमतेचे एकूण ३७१ पंप उपलब्ध केले जातील. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ मार्गावर पावसाळ्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी काय?मान्सूनसंबंधित घ्यावयाच्या खबरदारीच्या सविस्तर सूचना सर्व अभियंते तसेच कंत्राटदारांना जारी केल्या आहेत.मान्सूनपूर्व उपाययोजना करणे तसेच पावसाळ्याच्या कालावधीत तयारी सुनिश्चित करण्यात येईल.अभियंते व कंत्राटदारांनी सर्व साइट्सवर मान्सूनपूर्व होणारी कामे सुरू केली आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास येणार आहेत.

महापालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम केले जात आहे. पावसाळ्यात बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये. स्थानकांच्या परिसरात पाणी साचू नये, याकरिता नियुक्त अधिकारी तैनात केले जातील. तसेच ठोस उपाययोजना केल्या जातील.अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन 

वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये, म्हणून काय?सर्व बाजूंचे दिशादर्शक, चेतावणी चिन्हे, वाहतूक चिन्हे याचे नव्याने रंगरंगोटीचे काम सुरूबॅरिकेड्सवर ब्लिंकर्स साइट्सवर उपलब्धबांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रभाव क्षेत्रामध्ये बॅरिकेड्सची दृश्यमानता वाढविण्यासाठी देखभाल पादचाऱ्यांकरता उपलब्ध रेलिंगवर रिफ्लेक्टिव्ह स्टिकर्स लावले जातील. साइट्सवर नियमितपणे विजेच्या तारा, केबल वायर्सचे ऑडिट केले जाईल.

टॅग्स :मुंबईमेट्रो