कुलाबा कॉजवेची शॉपिंग स्ट्रीट दोन दिवसांत हटवली जाणार, कोर्टाचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:11 IST2025-03-27T15:09:23+5:302025-03-27T15:11:03+5:30
मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील २५३ पैकी फक्त ८३ फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित १७० फेरीवाल्यांना दोन दिवसांत हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

कुलाबा कॉजवेची शॉपिंग स्ट्रीट दोन दिवसांत हटवली जाणार, कोर्टाचे आदेश!
मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील २५३ पैकी फक्त ८३ फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित १७० फेरीवाल्यांना दोन दिवसांत हटवा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकामे, साहित्य आणि वस्तू हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देशही महापालिकेने दिले आहेत.
याबाबत कॉजवे टुरिझम हॉकर्स स्टॉप युनियनने याचिका दाखल केली होती. माय ड्रीम कोलाबा या रहिवाशांच्या गटाने या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल करुन बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक त्रास निर्माण करत असल्याचं म्हटलं होतं. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले, हे स्टॉल नॉन-हॉकिंग झोनमधील फूटपाथवर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना खूप अडचणी येतात. या स्टॉलचा पार्किंग क्षेत्रालाही अडथळा निर्माण होऊन वाहतुकीवर परिणाम होतो आहे.