Join us

रेल्वे रुळांना थंडीचा तडाखा

By admin | Published: November 15, 2016 6:35 AM

रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या घटना मध्य रेल्वेवर सातत्याने घडत आहेत. रात्री थंडी व दिवसभर तापतान जास्त असल्याने वातावरणात फरक पडतो

मुंबई : रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या घटना मध्य रेल्वेवर सातत्याने घडत आहेत. रात्री थंडी व दिवसभर तापतान जास्त असल्याने वातावरणात फरक पडतो. त्याचा फटका रुळांनाही बसत असून गेल्या आठवडाभरात रुळांना तडा गेल्याच्या तीन घटना घडल्या आहे. गेल्या सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रुळाला तडा जाण्याची घटना घडली होती. या घटनेमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याबरोबरच काही फेऱ्यांना लेटमार्कही लागला होता. त्यानंतर शनिवारी कल्याण येथे सकाळी साडे सातच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक पाचजवळ रुळाला तडा गेली. या घटनेनंतर १४ नोव्हेंबर रोजी वांगणी व शेलू दरम्यान रुळाला तडा जाण्याची घटना घडली . १४ नोव्हेंबर रोजी सकाळी तर याच कारणांमुळे मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ६७ टक्क्यांपर्यंत आला. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)