बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी, गृहमंत्र्यांकडून आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

By महेश गलांडे | Published: December 25, 2020 06:33 PM2020-12-25T18:33:26+5:302020-12-25T18:34:36+5:30

रामदास आठवलेंचा केंद्रीयमंत्रीपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, एक सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्ता ते केंद्रीयमंत्री असा संघर्षमय प्रवास आठवलेंनी केला आहे.

Cold out, put on a bundy, poetic greetings remembered by the Home Minister anil deshmukh | बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी, गृहमंत्र्यांकडून आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी, गृहमंत्र्यांकडून आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

Next
ठळक मुद्देगृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आठवलेंना खास आठवलेस्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा आज जन्मदिवस आहे. त्यामुळे, देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यापांसून ते दिग्गज नेतेमंडळींनीही त्यांना 61 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियात त्यांच्या कविताही शेअर करण्यात आल्या आहेत. तर, अनेकांना काव्यमय रितीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आठवलेंना खास आठवलेस्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवलेंचा केंद्रीयमंत्रीपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, एक सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्ता ते केंद्रीयमंत्री असा संघर्षमय प्रवास आठवलेंनी केला आहे. दलित पॅंथर चळवळीच्या काळात त्यांची 'सर्वांना सोबत घेऊन जाणारा', 'राज्यभर फिरणारा' आणि 'एक खंदा कार्यकर्ता', अशी ओळख निर्माण झाली होती. कार्यकर्तांची मोट बांधत बांधत त्यांनी आपल्या पाठीमागे मोठा जनाधार उभा केला. पण आधी राष्ट्रवादीसोबत मैत्री आणि मग ज्यांच्यावर टीका करत होते, त्या भारतीय जनता पक्षाबरोबरच हातमिळवणी, अशा राजकीय कोलांट उड्या खालल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. मात्र, आपल्या मजेशीर स्वभावामुळे आणि चारोळ्यांमुळे ते गल्लीपासून दिल्लीपर्यत अनेकांचे चाहते बनले आहेत. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आज ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. 

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

अशा शब्दात गृहमंत्र्यांनी रामदास आठवलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आठवलेंना जन्मदिनी याच प्रेमातून काव्यमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रामदास आठवलेंना दबंग कवी संबोधत त्यांना काव्यमय शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Web Title: Cold out, put on a bundy, poetic greetings remembered by the Home Minister anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.