लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत येत्या ४८ तासांत तापमानात घट होईल. कमाल तापमान ३० अंशाखाली तर, किमान तापमान १४ ते १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. परिणामी, थंडीचा कडाका पुन्हा वाढणार असतानाच दुसरीकडे सध्या मुंबईच्या तापमानात वाढ होत आहे. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यात बऱ्यापैकी गारठा पडला होता. विशेषत: मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर दाखल झाले होते.
कोकणही गारठणारयंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणखी गारठणार असून, मुंबईचे तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशाच्या खाली घसरेल. राज्यात २० डिसेंबरपासून थंडी आणखी वाढणार असून तापमान ५ अंशापेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे.