Join us

मुंबईत थंडीचा कडाका कायम

By admin | Published: January 22, 2016 3:24 AM

बुधवारी नोंदविण्यात आलेल्या मुंबईच्या १२ अंश किमान तापमानात गुरुवारी ३ अंशाची वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : बुधवारी नोंदविण्यात आलेल्या मुंबईच्या १२ अंश किमान तापमानात गुरुवारी ३ अंशाची वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वेगाने वाहत आहेत. शीत वाऱ्यामुळे राज्यासह मुंबईचे किमान तापमान आणखी कमी झाले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)राज्यात गुरुवारी सर्वांत कमी तापमान नाशिक येथे ७.५ अंश नोंदवण्यात आले...२२ जानेवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी थंडी राहील.२३ जानेवारी : संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२४-२५ जानेवारी : दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.२२-२३ जानेवारी : मुंबई व आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १५ अंशाच्या आसपास राहील.