मुंबई : डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जबाबदारीवरून अद्यापही वाद कायम आहे. एकीकडे ही इमारत अनधिकृत असल्याचा दावा म्हाडा प्रशासन करीत आहे. परंतु, केसरबाई इमारत आणि दुर्घटनाग्रस्त इमारतीचे प्रॉपर्टी कार्ड एकच आहे. पालिकेकडून १९९४ मध्ये या इमारतीचे करनिर्धारण करण्यात आले होते. त्यानुसार म्हाडाच्या केसरबाई इमारतीला लागूनच असलेल्या ‘सी-२५’ इमारतीचाच हा भाग असल्याची नोंद पालिकेकडे असल्याचा धक्कादायक खुलासा पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केला आहे.डोंगरी येथील दुर्घटनेचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. ही दुर्घटना नसून निष्काळजीपणामुळे झालेली हत्याच आहे, असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. बी विभागातील पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदा बांधकामे होत आहेत. त्यामुळे या दुर्घटनेला पालिका अधिकारी जबाबदार असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला. सुमारे दीड-दोन तास चाललेल्या चर्चेनंतर आयुक्तांनाच यावर खुलासा करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत बोलाविण्यात आले.आयुक्तांनी यावर खुलासा करताना कोसळलेली इमारत म्हाडाचीच उपकरप्राप्त इमारत असल्याचे सांगितले. मात्र कोसळलेली इमारत कधी बांधण्यात आली याची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या इमारतींचा आराखडा नाही. ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती. मग पाणी-वीजपुरवठा खंडित का केला नाही? याबाबत माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.>पालिका अधिकाऱ्यांना अभयबी विभागात बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात असूनही अधिकारी त्याकडे डोळेझाक करतात. त्यामुळे या प्रकरणात सर्व संबंधित अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. मात्र डोंगरीतील सदर बांधकाम बेकायदा असल्यास त्यास आताचे अधिकारी जबाबदार नाहीत. १९९४ मध्ये या विभागात असलेल्या अधिकाºयांची चौकशी करावी लागेल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली.
कोसळलेली इमारत म्हाडाचीच, १९९४ मध्ये केले होते करनिर्धारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:13 AM