फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली, रेल्वे मालामाल; ३०० कोटींचा जमला गल्ला
By सचिन लुंगसे | Published: April 5, 2024 09:25 PM2024-04-05T21:25:01+5:302024-04-05T21:25:25+5:30
तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरित्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.
मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जात असून, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान मध्य रेल्वेने विनातिकीट / अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या साहित्याच्या ४६.२६ लाख प्रकरणांमधून ३०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक असून २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरित्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.
---------------
सुनील नैनानी, ट्रॅव्हल तिकीट निरीक्षक, मुंबई - २०,११७ प्रकरणांमधून १.९२ कोटी
एम.एम. शिंदे, मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई - १८,२२३ प्रकरणांमधून १.५९ कोटी
धर्मेंद्र कुमार, प्रवास तिकीट निरीक्षक, मुंबई - १७,६४१ प्रकरणांमधून १.५२ कोटी
रुपाली माळवे, महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक, पुणे - १५,०१५ प्रकरणांमधून १.३१ कोटी
मनीषा छकने, महिला मुख्य टिकट परीक्षक, पुणे - १३,००४ प्रकरणांमधून १.२१ कोटी
---------------
प्रकरणांची संख्या आणि प्राप्त महसूल
मुंबई विभाग - २०.५६ लाख प्रकरणांमधून ११५.२९ कोटी
भुसावळ विभाग - ८.३४ लाख प्रकरणांमधून ६६.३३ कोटी
नागपूर विभाग - ५.७० लाख प्रकरणांमधून ३४.५२ कोटी
सोलापूर विभाग - ५.४४ लाख प्रकरणांमधून ३४.७४ कोटी
पुणे विभाग - ३.७४ लाख प्रकरणांमधून २८.१५ कोटी
मुख्यालय - २.४७ लाख प्रकरणांमधून २०.९६ कोटी